Thursday, September 30, 2010
सोलापुरात आजपासून दोन दिवस विश्व शाहीर परिषदेचे आयोजन
सोलापुरात आजपासून दोन दिवस विश्व शाहीर परिषदेचे आयोजनसोलापूर, २४ सप्टेंबर/ प्रतिनिधीमराठा सेवा संघाच्या शाहीर परिषदेच्यावतीने उद्या शनिवारी व रविवारी (दि. २५ व २६) दोन दिवस सोलापुरात विश्व शाहीर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा स्मृतिमंदिरात होणाऱ्या या शाहीर परिषदेचे उद्घाटक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे आहेत.उद्या दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या उद््घाटन सोहळ्यात सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या शाहीर परिषदेस देशभरातून हजारापेक्षा अधिक शाहीर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या वेळी मान्यवर शाहीर व लोककलावंतांना पुरस्कार देऊन गौरविले जाणार असल्याचे मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष तथा शाहीर परिषदेचे संयोजक शिरीष जाधव यांनी सांगितले.

सोलापुरात होणार विश्व शाहीर परिषद
सोलापुरात होणार विश्व शाहीर परिषद
माळशिरस, ८ सप्टेंबर/वार्ताहरस्वातंत्र्यपूर्व व मोगलाईच्या काळात आपल्या शाहिरीने नवचैतन्य निर्माण करीत अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास चिथावणी देणाऱ्या शाहिरांच्या शाहिरीचे काळानुरुप रुप बदलण्यासाठी सोलापुरात येत्या २५ व २६ रोजी विश्व शाहीर परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव मानेशेंडगेंनी दिली.या वेळी मानेशेंडगे म्हणाले की, त्या त्या काळात लोककलाकारांनी आपल्या भूमिका अत्यंत प्रभावीपणाने बजावल्या. त्यामध्ये शाहिरांचा हिस्सा मोठा होता. आजही हे शाहीर आपली कला जपण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करताना दिसत आहेत. काळानुरूप शाहिरीचे स्वरुप बदलणे व तशी त्यांना दिशा दिली पाहिजे म्हणून मराठा सेवासंघ संचलीत महाराष्ट्र राज्य शाहीर परिषदेच्या माध्यमातून या परिषदेत भव्य शोभायात्रा तसेच शाहिरीचा इतिहास, उगम व वाटचाल तसेच शिवकाळ व शाहीर या विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने होणार आहे. तसेच सहभागी शाहिरांच्या निवास, भोजनाबरोबरच वादक व कोरसांची सोय केली असून त्यांना प्रवासखर्च व मानधनही देण्यात येणार आहे.सिंदखेडराजा या ठिकाणी उद्या दि.९ पासून दि. १२ पर्यंत अपेक्षित १ हजार कुटुंबाच्या शिवआनंद सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी विशेषत: तरुण जोडप्यांना निमंत्रित केले आहे. या सोहळ्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वैयक्तिक सामूहिक कार्यक्रम, नामांकित वक्तयांची व्याख्याने, जादूचे प्रयोग, संमोहन, वकृत्व, नाटय़छटा, नृत्य, अंधश्रद्धा निर्मूलन आदी भरगच्च कार्यक्रमांचे तर लहान मुलांसाठी आनंदनगरीचे आयोजन केले आहे. पाच वर्षांखालील बालकांसाठी प्रवेश मोफत असला तरी त्यावरील प्रत्येकासाठी १०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगून या सोहळ्याचा लाभ घेण्याचेही आवाहन उत्तमराव माने शंडगे यांनी केले आहे.

Subscribe to:
Posts (Atom)