Thursday, September 30, 2010
सोलापुरात आजपासून दोन दिवस विश्व शाहीर परिषदेचे आयोजन
सोलापुरात आजपासून दोन दिवस विश्व शाहीर परिषदेचे आयोजनसोलापूर, २४ सप्टेंबर/ प्रतिनिधीमराठा सेवा संघाच्या शाहीर परिषदेच्यावतीने उद्या शनिवारी व रविवारी (दि. २५ व २६) दोन दिवस सोलापुरात विश्व शाहीर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा स्मृतिमंदिरात होणाऱ्या या शाहीर परिषदेचे उद्घाटक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे आहेत.उद्या दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या उद््घाटन सोहळ्यात सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या शाहीर परिषदेस देशभरातून हजारापेक्षा अधिक शाहीर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या वेळी मान्यवर शाहीर व लोककलावंतांना पुरस्कार देऊन गौरविले जाणार असल्याचे मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष तथा शाहीर परिषदेचे संयोजक शिरीष जाधव यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment